Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक

मुंबई : रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी पाच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी हा ब्लॉक सुरू होईल आणि दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत हा ब्लॉक लागू असेल. ज्यादरम्यान मध्य रेल्वेवरील लोकल सेवा बाधित होणार आहेत. मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गतीच्या लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गांवर वळवण्यात येतील. तर, मुलुंडपुढे त्या धीम्या मार्गावर आणल्या जातील.

हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी ११ वाजून १०मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत ब्लॉक असणार आहे. यादरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार असून, कुर्ला-पनवेल, वाशीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतला जाईल. शनिवारी रात्री १२ वाजता हा ब्लॉक सुरू होणार असून, रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत जवळपास १० तासांसाठी हा ब्लॉक घेतला जाईल. अंधेरी ते गोरेगावदरम्यानच्या अप आणि डाऊन हार्बर मार्गांवर रविवारी रात्री काही तांत्रिक कामांसाठी पॉवर ब्लॉक घेतला जामार आहे. ज्यामुळं रात्री १२. ३० वाजल्यापासून सकाळी १०. ३० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाईल. दरम्यानच्या काळात गोरेगाव हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा बंद असेल.
Comments
Add Comment