Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मयांक यादवची सरप्राईज एंट्री

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मयांक यादवची सरप्राईज एंट्री

मुंबई: बीसीसीआयने बांगलादेशविरुद्ध ६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादव टी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसेल तर आगामी मालिकेत मयांक यादवलाही टीम इंडियामध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबरला, दुसरा सामना ९ ऑक्टोबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना १२ ऑक्टोबरला रंगणार आहे.


काही दिवसांपूर्वी भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवला बुची बाबू स्पर्धेदरम्यान हाताला दुखापत झाली होती. सूर्या आता पूर्णपणे फिट आहे. मिस्ट्री स्पिन गोलंदाज वरूण चक्रवर्ती २०२१मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. ३ वर्षांनी तो पुनरागमन करत आहे. संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांना विकेटकीपर म्हणून ठेवण्यात आले आहे. सॅमसन याआधी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दोन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता.


आयपीएल २०२४मध्ये लखनऊ सुपरजायंट्ससाठी खेळणाऱ्या मयांक यादवलाही पदार्पणाची संधी मिळत आहे. मयांकने आयपीएलच्या सध्याच्या हंगामात सातत्याने १५० किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.


टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ - सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, मयंक यादव.

Comments
Add Comment