द्वारका: गुजरातच्या द्वारकामध्ये शनिवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. यात चार मुलांसह सात जणांना आपला जीव गमवावा लागला तर १४ जणांना गंभीर जखमा झाल्या आहेत. अपघातात बसने आपले नियंत्रण गमावल्याने ती डिव्हाईडर पार करून तीन गाड्यांना टक्कर दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ५१वर शनिवारी रात्री साधारण पावणेआठच्या सुमारास घडला. ही बस द्वारका येथून अहमदाबाद येथे जात होती. रस्त्यामध्ये प्राणी आल्याने बसच्या ड्रायव्हरने नियंत्रण गमावले. प्राण्यांना वाचवण्यासाठी बस
४ मुलांसह सात जणांचा मृत्यू
डिव्हाईडरला आपटली आणि स्पीड अधिक असल्याने बसने डिव्हाईडर पार करून समोरून येणाऱ्या तीन भरधाव गाड्यांना टक्कर दिली.
बसची धडक एक मिनी व्हॅन, एक कार आणि एका मोटारसायकलला बसली. यात अपघातात चार चिमुकल्यांसह सात जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर १४ जण जखमी झाले. यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिनी व्हॅनमधून प्रवास करत असणाऱ्या ६ जणांचा मृत्यू
या अपघातात प्राण गमावणारे ६ जण मिनी व्हॅनमध्ये होते. तसेच बसमधील एकाचा मृत्यू झाला. यात चार मुले, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
गांधीनगरला जात होती मिनी व्हॅन
घटनास्थळावरील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी व्हॅन द्वारका येथून गांधीनगरच्या दिशेने जात होती. आपल्या गंतव्य स्थानापासून ते काही किलोमीटर दूर होते. मृतांमध्ये ६ जण गांधीनगरच्या कलोल येथे राहत होते.