चंद्रपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे १ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. ते सकाळी साडेदहा वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन झाल्यावर त्या ठिकाणाहून वन अकादमीकडे प्रयाण करतील. वन अकादमी येथे सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चा करणार आहेत.
त्यानंतर दुपारी २ वाजता वन अकादमी येथून दुपारी ३ वाजता पोंभुर्णाकडे जात आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणी करीत आदिवासी मेळाव्याला उपस्थित राहतील. रात्री वन अकादमी येथे मुक्काम करून २ ऑक्टोबर रोजी सकाळी गडचिरोली येथे जातील.