सोलापूर : मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरून स्कार्पिओ गाडीतून जात असलेला गोवा बनावटीचा विदेशी दारूचा अवैद्यसाठा कामती पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला. १० लाख ५० हजार रुपयांची अवैद्य दारू व ५ लाख रुपयांची स्कार्पिओ असा एकुण १५ लाख ५० हजार २०० रुपयांचा माल पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहन चालकाने दाट झाडीत वाहन सोडून पळ काढला.
याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगळवेढा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर ( बेगमपूर) गावातुन एक स्कॉर्पिओ जात असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची विदेशी दारूचा अवैध साठा आहे. तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार यांनी घोडेश्वर गावच्या पुढील बाजूस वडदेगाव जाणाऱ्या रोडवर कामती पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा सापळा लावला.