Friday, October 31, 2025
Happy Diwali

डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर घेता का? हे आहे धोकादायक

डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर घेता का? हे आहे धोकादायक

मुंबई: डोकेदुखीचा त्रास सतावत असेल तर आणखी चिडचिड होते. अशा स्थितीमध्ये डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी अनेकजण पेनकिलर खातात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की पेनकिलरमुळे शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होताता.

डोकेदुखीचा त्रास झाल्यास लगेचच खाऊ नका पेनकिलर

डॉक्टरांच्या मते डोकेदुखी झाल्यास लगेचच पेनकिलर खाऊ नका. कारण यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. पेनकिलर खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. यामुळे त्रास, सूज तसेच अनेक समस्या उद्भवतात. पोटात अल्सर होण्याचा धोकाही वाढतो. केवळ इतकेच नव्हे तर लिव्हर आणि किडनीलाही धोका असतो. यामुळे इम्युनिटी कमकुवत होते. तसेच हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो.

डोकेदुखीवर गोळी घेतल्यानंतर लगेचच आराम पडतो मात्र दीर्घकाळासाठी गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे डोकेदुखी झाल्यास लगेचच गोळी खाऊ नये.

डोकेदुखीमध्ये लगेचच गोळी खाल्ल्याने हे होते नुकसान

औषधांचा ओव्हरडोस झाल्यास पोटातील नर्व्हस सिस्टीम आणि शरीराच्या इम्युनिटीवर गंभीर परिणाम होतात.

या कारणामुळे पोटाशी संबंधिक समस्या जसे सूज, अपचन होऊ शकते.

डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्याने लिव्हर आणि किडनीसारख्या अंगांवर परिणाम होतो.

औषधे घेतल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.

डोकेदुखीमध्ये अधिक पेनकिलर खाल्ल्यास हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे हॉर्ट अॅटॅकचाही धोका वाढतो.

डोकेदुखीनमध्ये जर तुम्ही सातत्याने पेनकिलर खात असाल तर पोटाचा अल्सरही होऊ शकतो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा