Monday, September 15, 2025

Petrol-Diesel Price : आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या किंमती होणार स्वस्त; इतक्या रुपयांची होणार कपात

Petrol-Diesel Price : आनंदाची बातमी; पेट्रोल-डिझेलच्या किंमती होणार स्वस्त; इतक्या रुपयांची होणार कपात

कच्चा तेलाच्या किंमतीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. कच्चा ऑईलमध्ये मार्चपासून ते आतापर्यंत १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र अद्याप तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात केलेली नाहीये. गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांना इंधनाच्या आघाडीवर मोठा दिलासा मिळालेला नाही आहे. फक्त म्हणायला किंमती लॉक करुन ठेवलेल्या आहेत. पेट्रोलवर मार्चपासून ते आतापर्यंत तेल कंपन्यांना प्रति लिटर १५ रुपयांचा फायदा झाला आहे. तर १२ रुपये प्रति लिटरचा नफा डिझेलवर मिळत आहे.

आता हरियाणासोबत इतर अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकार यावेळी मतदारांना इंधन किंमतीत कपात करुन दिलासा देण्याच्या तयारीत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या तोंडावर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर २ ते ३ रुपये कपात करण्याच्या विचारामध्ये आहे. हा निर्णय कधी घेण्यात येणार याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण येणाऱ्या महिनाभरात मोदी सरकार असा निर्णय घेऊन सुखद धक्का देण्याच्या तयारीत आहे.

कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण

कच्चा तेलाच्या किंमती मार्च महिन्यात जवळपास ८४ डॉलर प्रति बॅरल इतक्या होत्या. आता प्रति बॅरल १६ डॉलर या किंमतीत म्हणजे जवळपास १९ टक्क्यांची घसरण झाली आहे. या किंमतीत गेल्या आठवड्यात जवळपास ४ डॉलरची कपात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांच्या नफ्यात या काळामध्ये जोरदार वाढ झाली आहे. कच्चा ऑईलच्या किंमतीत घसरण होऊन सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही कपात झालेली नाही.

मग स्वस्ताई होणार तरी कधी?

येणाऱ्या दोन महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताई विषयीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कच्चा तेलाचे भाव रेटिंग एजन्सी इक्रानुसार जर येत्या दोन महिन्यात स्थिर राहिले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ ते ३ रुपये प्रति लिटरची कपात होण्याची शक्यता आहे. सध्या देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल आंध्र प्रदेशात मिळते. या राज्यामध्ये पेट्रोल १०८.४६ रुपये प्रति लिटर मिळतं तर डिझेल ९६ रुपये प्रति लिटर आहे.

Comments
Add Comment