Sunday, October 6, 2024
HomeदेशNarendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो", मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Narendra Modi : “हा नवा भारत, घरात घुसून मारतो”, मोदींचा काँग्रेसवर घणाघात

जम्मू : आज जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना शहीद भगतसिंग यांना आदरांजली वाहिली. विधानसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्मीरमधील ही शेवटची सभा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोदी म्हणाले की, “जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागांना भेट देण्याची संधी गेल्या आठवड्यात त्यांना मिळाली आणि ते जिथे गेले तिथे त्यांना भाजपाचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.”

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीवर चांगलाच निशाणा साधला आहे. “जम्मू-काश्मीरमधील लोक या तीन घराण्यांच्या राजकारणाला खूप कंटाळले आहेत. आता दहशतवाद, फुटीरतावाद आणि रक्तपात इथल्या लोकांना नको आहे. लोकांना त्यांच्या मुलांचं चांगले भविष्य आणि शांतता हवी आहे. त्यामुळेच भाजपा सरकारला लोक पाठिंबा देत आहेत. लोकांचा उत्साह जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट झालं आहे” असं म्हटलं आहे.

“हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो”

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली. “आजचीच रात्र होती जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला. आणि त्यावेळी भारताने जगाला दाखवून दिलं होतं की, “हा नवीन भारत आहे, जो घरात घुसून मारतो” असं मोदींनी सांगितलं. तसंच काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याचा आरोप करत या मुद्द्यावर आजही काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचं म्हटलं आहे.

जम्मूच्या जनतेला विशेष आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले, “यापूर्वी इतिहासात कधीही अशी संधी मिळाली नाही, जी या निवडणुकीत आली आहे. जम्मू काश्मीरमधील लोकांच्या इच्छेनुसार सरकार पहिल्यांदाच स्थापन होणार आहे. ही महत्त्वाची संधी असून ती गमावू नये. भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर जम्मूतील जनतेचं सर्व दुःख दूर करू.” नवरात्री आणि विजयादशमीचा संदर्भ “निवडणुकीचे निकाल ८ ऑक्टोबर रोजी, नवरात्रीच्या दिवशी येतील आणि यावेळी विजयादशमी ही एक शुभ सुरुवात असेल” असंही मोदींनी म्हटलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -