पोलीस ॲक्शन मोडवर
मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दहशतवाद्यांकडून (Terrirst Attack) मुंबईला (Mumbai News) धोका असल्याची माहिती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आले असून पोलिसांकडून मुंबईतील प्रत्येक ठिकाणावर नजर ठेवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सेंट्रल एजन्सीकडून मुंबई पोलिसांना (Mumbai Police) मुंबईवर दहशतवाद्यांकडून हल्ला होण्याची भीती असल्याची माहिती दिली. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून मुंबईत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर ‘मॉक ड्रिल्स’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर शहरातील सर्व डीसीपींना त्यांच्या-त्यांच्या झोनमध्ये सुरक्षा व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दंगली किंवा गालबोट लागेल, असं काही होऊ नये यासाठी मुंबई पोलीस विशेष खबरदारी घेत आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.