ठाणे : म्हाडाकडून (Mhada) नुकतेच मुंबईतील काही भागात घरांची सोडत (Lottery)काढण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा म्हाडाच्या कोकण मंडळाकडून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हाडाकडून लवकरच ठाणे (Thane) शहरात घरांची लॉटरी काढली जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी असणार आहे.
येत्या ८ ऑक्टोबर रोजी म्हाडा कोकण मंडळातर्फे घरांची लॉटरी काढली जाणार आहे. यामध्ये ७ हजार घरांचा समावेश असून विशेषत: ही घरे फक्त २० लाखांपर्यंतच ठेवण्यात आले आहेत.
९१३ घरांचीही काढणार सोडत
दरम्यान, म्हाडाला खासगी बिल्डरकडून प्राप्त झालेल्या ९१३ घरांचा समावेश आहे. ही घरे ठाणे, टिटवाळा तसेच वसई या परिसरातील असणार आहे. येत्या ३ ऑक्टोबर रोजी ठाण्यातील २० टक्के योजनेतील ९१३ घरांची जाहिरात येणार आहे. यात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असणार आहे.