Friday, July 11, 2025

जम्मू-काश्मीर चकमकीत एएसपीसह ५ जवान जखमी

जम्मू-काश्मीर चकमकीत एएसपीसह ५ जवान जखमी

कुलगांम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे ४ जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी ही माहिती दिली. कुलगामच्या आदिगाम देवसर येथे पहाटे चकमक झाली.


कुलगामच्या आदिगाम देवसर येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या परिसराला वेढा टाकून शोध मोहिम हाती घेतली. यावेळी लपलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्यावर चकमक उडाली. यावेळी गोळीबारात लष्कराचे ४ जवान आणि एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


'जखमींना तात्काळ वैद्यकीय सुविधेत नेण्यात आले असून, जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.' चकमक सुरू झाल्यानंतर लगेचच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला. या परिसरात दोन दहशतवादी लपले असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरील (एक्स) पोस्टमध्ये म्हटले होते की, 'कुलगामच्या आदिगाम देवसर भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि सुरक्षा दल कामाला लागले आहेत. ही पोस्ट शेअर केल्यानंतर ५ जण जखमी झाल्याची माहिती पुढे आली.

Comments
Add Comment