Tuesday, April 29, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Xiaomi Redmi Note 14 सीरिज लाँच, 6200mAh बॅटरी, दमदार फीचर्स

Xiaomi Redmi Note 14 सीरिज लाँच, 6200mAh बॅटरी, दमदार फीचर्स

मुंबई: Xiaomiने आपले नवे स्मार्टफोन्स लाँच केले आहे. कंपनीने Redmi Note 14 सीरीज चीनमध्ये लाँच केली आहे. यात तीन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने Redmi Note 14, Note 14 Pro आणि Note 14 Pro+ लाँच केले आहेत. हे सर्व स्मार्टफोन AMOLED डिस्प्लेसह येतो.

स्टँडर्ड व्हेरिएंटमध्ये तुम्हाला फ्लॅट स्क्रीन मिळते. तर प्रोव्हेरिएंटमध्ये कंपनीने कर्व्ह्ड डिस्प्ले दिला आहे. हा फोन सध्या चीनमध्ये लाँच झाला आहे. भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये कंपनी हे फोन्स या वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला लाँच करणार.

किती आहे किंमत?

Redmi Note 14 सीरिज सध्या चीनपर्यंत मर्यादित आहे. या सीरिजमध्ये Redmi Note 14 ची किंमत ११९९ युआन(साधारण १४,५०० रूपये) पासून सुरू होते. Redmi Note 14 proची किंमत १४९९ युआन(साधारण १८ हजार रूपये)पासून सुरू होते. तर Redmi Note 14 Pro+ ची किंमत १९९९ युआन(साधारण २४ हजार रूपये)पासून सुरू होते.

काय आहेत स्पेसिफिकेशन?

६.६७ इंचाचा डिस्प्ले 120 hz रिफ्रेश रेट मीडियाटेक डायमेंसिटी 7025 Ultra प्रोसेसर Android 14 पर आधारित Hyper OS वर काम करतो १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज 50MP + 2MP ड्युअल कॅमेरा, १६ एमपी फ्रंट कॅमेरा 5110mAh बॅटरी

Comments
Add Comment