Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीHeavy Rain : परतीच्या पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी!

Heavy Rain : परतीच्या पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी!

मुसळधारेने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

मुंबई : राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. या पावसामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये अक्षरश: पाणी आले आहे. लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

२ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. २४ व २५ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

हातातोंडाशी आलेले पीक गेले वाया

पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांची पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

कोणत्या भागात किती झाले नुकसान?

बीडमध्ये ८ हजार हेक्टर, धाराशिवमध्ये ७ हजार हेक्टर, नांदेडमध्ये ५ हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यानंतर सांगली जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. सांगलीत ४ हजार ८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापुरात ३ हजार २०० हेक्टर, पुण्यात ४३० हेक्टर, अहमदनगरमध्ये ९१६ हेक्टर, जळगावात ३१७ हेक्टर, नाशिकमध्ये २५ हेक्टर, धुळ्यात १ हजार ७० हेक्टर आणि पालघरमध्ये ५५.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -