रघुराम राजन स्पष्टच बोलले! गेल्या १० वर्षांत पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी पण...

देशांतर्गत उत्पादन, रोजगार निर्मितीसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज


नवी दिल्ली : गेल्या १० वर्षांत भारताने पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे, अशा शब्दांत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले आहे. परंतु दुसरीकडे देशांतर्गत उत्पादन आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी इतर क्षेत्रांमध्ये अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजन बोलत होते. भारताला या दशकातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ७ टक्के विकास दर पुरेसा असेल का, असे विचारले असता राजन म्हणाले की, सात टक्क्यांच्या दराने विकास झाला तर आपण जर्मनीला आणि तीन वर्षांत जपानला मागे टाकू. ही काही अशक्य गोष्ट नाही. सर्वात चिंतेची बाब म्हणजे जेव्हा आपण विकसित राष्ट्र म्हणतो, तेव्हा विकसित होणे म्हणजे काय हे आपण तपासले पाहिजे?


मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील सर्वाधिक गरज शिक्षणावर भर देण्याची आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर सरकारचे लक्ष हे योग्य पाऊल आहे, परंतु हे काम योग्यरित्या पार पाडणे देखील महत्त्वाचे आहे.


मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा हेतू चांगला आहे. पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात आपण बरेच काही केले आहे, असे मला वाटते. दरम्यान सरकारने आपल्या टीकाकारांकडून इतर क्षेत्रातील आवश्यक पावलांची माहिती गोळा करून त्यानुसार काम केले पाहिजे. जर आपण त्यावर लक्ष केंद्रित केले तर मला वाटते की, मेक इन इंडियाच्या संकल्पनेला बळ मिळेल, असेही राजन म्हणाले.

Comments
Add Comment

विमानतळावरचे महागडे पदार्थ खरेदी करायचे नसतील तर ट्राय करा ही आयडिया

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन (T1) कडे जात असताना एका प्रवासी महिलेनं महागडे पदार्थ खरेदी करण्याआधी

धक्कादायक! वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, वंशद्वेषातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा संशय

लंडन: ब्रिटनच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक

भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची शिफारस

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश बीआर गवई (भूषण रामकृष्ण गवई) यांनी सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्यानंतरचे

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि