सुट्टीच सुट्टी! तब्बल १५ दिवस ऑक्टोबर महिन्यात बँका बंद

  75


मुंबई : सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आता लवकरच ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. म्हणूनच अनेकजण आता पुढच्या महिन्यात करावयाच्या कामांची यादी करत असतील.अशातच बँकेशी निगडित काही कामे असतील तर याआधी बँकांना सुट्टी नेमकी आहे कधी? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. ऑक्टोबर महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन आखायला हवे. पुढच्या महिन्यात नवरात्री, दसरा, दिवाळी, असे अनेक महत्त्वाचे सण आहेत त्यामुळे या महिन्यात तब्बल १५ दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात नक्की कोणत्या दिवशी बँका बंद असतील, हे जाणून घ्या...




एकूण १५ दिवस बँका बंद



भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला संबंधित महिन्यात बँकेला किती सुट्ट्या असतील हे पहिलं जाहीर केल जाते. ऑक्टोबर महिन्यात याच यादीनुसार देशभरातील बँकांना एकूण १५ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यामध्ये शनिवार आणि रविवार या दिवशी असणारी सुट्टी आणि वेगवेगळ्या सणांनिमित्त असणाऱ्या सुट्ट्यांचा समावेश आहे. एकूण १५ ऑक्टोबर महिन्यात दिवस बँका बंद असणार आहेत, मात्र काही राज्यांना या सुट्ट्या लागू असतील तर काही राज्यांना त्या लागू नसतील. म्हणजेच आरबीआयने स्थानिक सण, उत्सवाला लक्षात घेऊन या सुट्ट्या दिलेल्या आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यामुळे या निवडणुकीमुळे तेथिल बँका एक दिवस बंद असतील. गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, लक्ष्मीपूजन, काटी बहू, दिवाळी अशा वेगवेगळ्या सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी असणार आहे.




ऑक्टोबर महिन्यात 'या' दिवशी बँका असतील बंद


१ ऑक्टोबर - जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे बँका बंद असतील.


२  ऑक्टोबर- संपूर्ण देशात महात्मा गांधी यांच्या जयंतीमुळे बँका बंद असतील.


३  ऑक्टोबर- जयपूरमध्ये नवरात्रीमुळे बँका बंद असतील.


६  ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.


१० ऑक्टोबर- दुर्गा पूजा, दसरा, महासप्तमी यामुळे अगरताळा, गुवाहाटी, कोलकाता, कोहिमा इथल्या बँका बंद असतील.


११ ऑक्टोबर- दसरा, महाअष्टमी, दुर्गा पूजा, दुर्गा अष्टमी, महानवमी, आयुध पूजा, यामुळे अगरताळा, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फआळ, पाटणा, रांची, शिलाँग, ईटानगर, कोहिमान, कोलकाता या भागात बँका बंद असतील.


१२  ऑक्टोबर- विजयदशमी, दुर्गा पूजा यामुळे पूर्ण देशात बँका बंद असतील.


१३  ऑक्टोबर- रविवारमुळे संपूर्ण देशात बँका बंद असतील.


१४  ऑक्टोबर- गंगटोक येथील दुर्गा पूजेमुळे बँका बंद असतील.


१६  ऑक्टोबर- अगरताळा कोलकाता येथे लक्ष्मी पूजामुळे बँका बंद असतील.


१७  ऑक्टोबर- बंगळुरू, गुवाहाटी येथे महर्षी वाल्मीकी यांच्या जयंतीनिमित्त बँका बंद असतील.


२०  ऑक्टोबर- रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.


२६  ऑक्टोबर- चौथा शनिवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.


२७  ऑक्टोबर- रविवार अशल्यामुळे संपूर्ण देशातील बँका बंद असतील.


३१  ऑक्टोबर- दिवाळीनिमित्त संपूर्ण देशातील बँका बंद असतील.


दरम्यान, या वेळात बँका बंद जरी असल्या तरी नेटबँकिंग आणि फोन बँकिंग चालू राहील.


Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये