Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : 'मी नाही त्यातली, कडी लाव आतली' हा सिनेमा काढ;...

Nitesh Rane : ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ हा सिनेमा काढ; त्यात आरे कॉलनीतल्या रशियन फिल्मस् दाखव!

नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात

मुंबई : किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत (Sanjay Raut) उघडा पडला. राऊतला १५ दिवसांची कोठडी सुनावली गेली. या प्रकरणामुळे ४२० संजय राजाराम राऊत हा भामटा आणि झाकणझुल्या रोज सकाळी उठून केवळ खोटे आरोप करतो, भुंकतो. त्याच्यात काहीही सत्य नसतं, हे दिसून आलं. रोज सकाळी उठून भुंकायचं, स्वत:च्या नावाची ब्रेकिंग न्यूज चालवायची. त्यानंतर कोर्टात गेल्यावर तिकडे माफी मागायची, गिडगिडायचं, नाक रगडायचं; पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून बोंबलत बसायचं. बाहेर छाती धडकून बोलायचं आणि कोर्टात जाताच घाम फुटून चड्डी पिवळी होण्याची सर्व नाटक महाराष्ट्र ओळखू लागला आहे, अशा शब्दात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांचे पितळ उघडे पाडले. त्याचबरोबर त्यांच्या मालकाची म्हणजेच उद्धव ठाकरेची (Uddhav Thackeray) देखील खिल्ली उडवली.

नेहमी खोटं बोलणाऱ्या संजय राजाराम राऊतला त्याचे घरातील माणसंच गांभीर्याने घेत नाही. म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आणि मीडियाच्या मित्रांनी याला किती गांभीर्याने घ्यावं याचा विचार करा, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.

संजय राऊतचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर जाईल

बाई मला न्याय.. असं काहीतरी चित्रपटाचं नाव देण्यापेक्षा ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ हे नाव द्या. संजय राऊतने काढलेला हा चित्रपट ब्लॉकबस्टर जाईल. कारण चित्रपटातील मुख्य कलाकाराला लागणारे सर्व गुण संजय राजाराम राऊतमध्ये आहेत. म्हणून जर चित्रपट काढण्याची इतकी खाज असेल तर संजय राजाराम राऊत याने ‘मी नाही त्यातली, कडी लाव आतली’ हा चित्रपट काढावा. जेणेकरुन तुझ्या आरे कॉलनीमधील गेस्टहाऊसमध्ये ज्या काही रशियन फिल्मस् निघाल्या आहेत, ते जनतेला समजेल. अन्यथा त्या फिल्मस दाखवण्यासाठी आम्हाला तारखा जाहीर कराव्या लागतील, असे टीकास्त्रही नितेश राणे यांनी सोडले.

त्याचबरोबर तिसऱ्या माळ्यावर वांग्या सारखा वाकलेला ‘वांग्या भाई’ ज्याला संजय राजाराम राऊत स्वत:चा मालक म्हणतो. त्याचा आधी विचार कर त्यानंतर दुसऱ्यांना नावं ठेवत बस. तुझ्या वांग्या भाईला मैदानावर एकटं उतरायला सांग. त्यानंतर त्याची आम्ही काय अवस्था करतो ते दिसेल.

मातोश्रीमध्ये बसलेला हा आधुनिक औरंग्या

मातोश्रीमध्ये बसलेला आधुनिक औरंग्या, आधुनिक टिप्या तोच आहे ज्याला या जन्मात उद्धव ठाकरे म्हणतात. औरंग्या कुठेही गेल्यावर लोकं अल्ला हु अकबर अशा घोषणा द्यायचे, तसचं आता उद्धव ठाकरे कुठल्याही जिल्ह्यात गेल्यानंतर त्याचं स्वागत करणाऱ्या ज्या गोल टोप्या असतात, त्याही अल्ला हु अकबरच्या घोषणा देतात. म्हणून दुसऱ्यांना औरंग्या बोलण्यापेक्षा स्वत:च्या हातात पाकिस्तानचा झेंडा असणाऱ्यांकडे लक्ष द्यावे.

विधानभवनावर शिवरायांचा भगवा झेंडा उभारणार

दरम्यान, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, बावनकुळे हे छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत. त्यांच्या अंगात भगवं रक्त वाहतं. म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी औरंग्यासह त्याचं राज्य गाढलं तसेच अमित शहा देखील मविआमधील सर्व हिरव्या पिल्लावळी ठेचून काढतील. ज्याप्रकारे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचं राज्य आणलं. तसेच या विधानसभेमध्ये औरंग्याच्या सर्व पिल्लांना, मविआच्या सर्व हिरव्या सापांना या महाराष्ट्राच्या भूमिमध्ये पुन्हा गाढून त्यांचा राजकीय पराभव करुन छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा पुन्हा एकदा विधानभवनावर आम्ही डौलाने उभा करु, असा विश्वासही नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -