Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीBig Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला धक्कादायक...

Big Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरात निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केला धक्कादायक खुलासा!

निक्कीने अरबाजचे कपडे घेतले अन्…

मुंबई : बिग बॉस मराठी सीजन ५ (Big Boss Marathi 5) च्या घरातील निक्की (Nikki Tamboli) आणि अरबाजच्या जोडीने प्रेक्षकांचे पहिल्या दिवसांपासून मनोरंजन केले. मागील आठवड्यात अरबाज घरातून बाहेर गेल्यानंतर निक्की खूपच नाराज होती. त्यानंतर सध्या बिग बॉसच्या घरात फॅमिली वीक (Family Week) सुरु आहे. काल अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकरची फॅमिली त्यांना भेटायला आली. त्यानंतर आज घरात निक्कीची आई तिला भेटायला येणार आहे. मात्र घरात येताच निक्कीची आई अरबाजबद्दल मोठा खुलासा करणार आहे. ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांच्या भुवया उंचावल्या जाणार आहेत.

निक्कीच्या आईने अरबाजबद्दल केलेला धक्कादायक खुलासाबाबत कलर्स मराठी चॅनलने इनस्टाग्राम अकाउंटवर व्हीडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये बिग बॉसच्या घरात निक्कीची आई निक्कीला समजवताना दिसत आहे. ‘हे अरबाजच चूकीचे चालू आहे. अरबाजचा साखरपुडा झाला आहे. त्याने असं नव्हतं करायला पाहिजे’ असं तिला सांगत आहे.

या गोष्टीनंतर निक्की चिडून बिग बॉसला म्हणते की, आता अरबाज आला तर मी मेन्टेंली पागल होईल. हे अरबाज आणि निक्की जे होतं ना ते एकदम ओव्हर झालं आहे. त्यानंतर निक्की बिग बॉसच्या घरातील अरबाजचे कपडे फेकून देताना दिसते.

दरम्यान, फिनालेमध्ये जेव्हा अरबाज समोर येईल तेव्हा निक्कीची काय प्रतिक्रिया असणार, याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -