Saturday, May 17, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; आठवडाभरात कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला!

Navra Maza Navsacha 2 : नवरा माझा नवसाचा २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; आठवडाभरात कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला!

मुंबई : काही दिवसांपूर्वीच 'नवरा माझा नवसाचा २' (Navra Maza Navsacha 2) हा चित्रपट रिलीज झाला. अभिनेता सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिस (Box Office) गाजवत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत असताना 'नवरा माझा नवसाचा २' हा चित्रपट २०२४चा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.


'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास २ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर विकेंड्स दरम्यान चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाल्यानंतर या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.५८ कोटी, दुसऱ्या दिवशी २.५ कोटी तर चार दिवसांमध्ये ९.०४ कोटींची कमाई करत ८ कोटींचा बजेट वसूल केला आहे.


आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने ६ दिवसांमध्ये तब्बल ११.०४ कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, नवरा माझा नवसाचा चित्रपटाला प्रेक्षकांकडून अतोनात प्रेम मिळाल्याप्रमाणे दुसऱ्या भागालाही चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे 'नवरा माझा नवसाचा २'ने जुना फर्निचर या चित्रपटाला देखील कमाईमध्ये मागे टाकून दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment