मुंबई : गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम सुलभ करण्यासाठी, शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री अप आणि डाऊन जलद मार्गावर ५ व्या मार्गिकेवर मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे.
हे ब्लॉक अप जलद मार्गावर रात्री १२ ते सकाळी १० वाजेपर्यंत डाऊन जलद मार्गावर रात्री १२. ४५ ते सकाळी ५ वाजेपर्यंत आणि ५व्या मार्गिकेवर रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत घेतले जातील.
या ब्लॉक कालावधीत, सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. सर्व ५व्या मार्गावरील मेल/एक्स्प्रेस गाड्या अंधेरी ते बोरिवली या दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालतील. या ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्यांमध्ये बदल होतील.