मुंबई: आपल्यापैकी अधिकांश लोकांकडे हे बचत खाते असतेच. प्रत्येकाचे कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते असते. या बचत खात्यामध्ये थोडीफार रक्कम बचतीच्या उद्देशाने ठेवली जाते.
दरम्यान, हल्ली बचतीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही लोक बचत खात्यातच शिल्लक पैसे ठेवतात. मात्र बचत खात्याबाबतचे हे २ मोठे नियम अधिकांश लोकांना माहीत नाहीत.
तुम्हाला माहीत आहे का की बचत खात्यामध्ये वर्षाला १० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येत नाही. यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास याची सूचना आयकर विभागाला मिळते.
याशिवाय प्रत्येक दिवशी २ लाखापेक्षा अधिक रूपयांचे ट्रान्झॅक्शन करता येत नाही. या ट्रान्झॅक्शन अकाऊंटमधून प्रत्येक पद्धतीची देवाण-घेवाणीचा समावेश आहे.