अमरावती : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आज राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची अमरावती येथील हॉटेल ग्रँड महफील हॉटेलमध्ये भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही भेट म्हणजे निव्वळ योगायोग की काही खलबतं या भेटीत रंगली, असे तर्क-वितर्क आता राजकीय वर्तुळात लढवले जात आहेत.
दरम्यान, राज ठाकरे हे २७ आणि २८ असे दोन दिवसीय अमरावती दौऱ्यावर आहेत. आज आणि उद्या दोन दिवस ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी अमरावती येथे आढावा बैठक घेऊन संवाद साधणार आहे. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. दोन्ही नेते एकाच हॉटेल मध्ये असल्याने उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.