मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी अनेक ठिकाणी विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता अक्षय शिंदे याच्या पालकांनी हायकोर्टात धाव घेतली होती. शुक्रवारी याबद्दल हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टाने सोमवारपर्यंत अक्षय शिंदेंचा मृतदेह दफन करा असे महत्त्वपूर्ण आदेश दिले.
अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी ठाणे, अंबरनाथ, बदलापुरमध्ये विरोध होत आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी याबद्दल हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. याबद्दल आता सुनावणी पार पडली. यावेळी वकील अमित कटाकनवरे यांनी अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे बाजू कोर्टात मांडली. यावेळी आरोपी अक्षय शिंदेचे आई-वडीलही कोर्टात उपस्थित होते.
सरकार तुम्हाला योग्य ते सहकार्य करेल. तसेच पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. यावर पुढील सुनावणी सोमवारी होईल, असे न्यायधीशांनी म्हटले. यानंतर आरोपीच्या वकिलांनी मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देऊ, त्यांनाही याप्रकरणातील सत्य समजले पाहिजे, असा प्रश्न न्यायधीशांना विचारला. त्यावर न्यायाधीशांनी सरकारला सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा. उद्या जरी दफन करण्यात आले तर सोमवारी आम्हाला याबद्दलची माहिती द्या, असे आदेश दिले.
या सुनावणीवेळी सरकारी वकिलांनी याप्रकरणी बाजू मांडली. स्थानिक पोलीस हे अक्षय शिंदे यांच्या आई वडिलांच्या सुरक्षिततेची काळजी घेत आहेत. मात्र अक्षय शिंदेच्या बाजूने असणारे वकील हे कोर्टाच्या बाहेर जाऊन चुकीची माहिती माध्यमांना देत आहेत. राज्य सरकारकडून अक्षय शिंदेच्या आई वडिलांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने होते.…
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…