Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीBhool Bhulaiyaa 3 : छुम छुम छुम ! ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये...

Bhool Bhulaiyaa 3 : छुम छुम छुम ! ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये दिसणार कार्तिक-विद्याची दमदार जुगलबंदी; टीझर प्रदर्शित

विद्या बालन (Vidya Balan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘भूल भुलैया’ २००७ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली आणि यानंतर ‘भूल भुलैया’च्या दुसऱ्या भागाबद्दल अनेक चर्चा सुरू रंगल्या होत्या. मात्र, दुसऱ्या भागात अक्षय कुमार नसून कार्तिक आर्यन आहे हे समजल्यावर कार्तिक आर्यनला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र २०२२ साली ‘भूल भुलैय्या ‘२ आल्यांनतर कार्तिकच्या कामाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं. ‘भूल भुलैया २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल १८५ कोटी रुपयांची मोठी दमदार कमाई केली.

अशातच आता या चित्रपटाचा तिसरा भाग येत असून, त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये कार्तिक आर्यनबरोबर विद्या बालनचीही चमक दिसत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता वाढली आहे.

विद्याचं पुनरागमन आणि पहिल्या भागाची आठवण

‘अमी जे तुमार’ या गाण्याने टीझरची सुरुवात होते आणि त्याबरोबरच विद्या बालनच्या पुनरागमनाची झलक पाहायला मिळते. यावेळी विद्या बालन एक जड खुर्ची उचलताना दिसत असून जोरात किंचाळताना दिसते. हे चित्र पाहून ‘भूल भुलैय्या’च्या पहिल्या भागातील त्या भयानक चित्राची आठवण होते, पहिल्या भागात त्या सीनमध्ये विद्या बालनच्या पात्राने एका हाताने पलंग उचलला होता.

पुन्हा एकदा कार्तिक आर्यन ‘रुह बाबा’ या भूत पकडणाऱ्या पात्राच्या भूमिकेत परतला आहे. मंजुलिकाच्या आत्म्याला पकडण्याचं काम त्याला दिलं जातं. या भागात कार्तिकच्या प्रेयसीच्या भूमिकेत तृप्ती डिमरी दिसत आहे. त्याचप्रमाणे माधुरी दीक्षित देखील या चित्रपटाचा भाग असल्याच्या अफवा होत्या, परंतु टीझरमध्ये तिची झलक दिसत नाही.

‘भूल भुलैया ३’मध्ये भयपटाची झलक

या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन आकाश कौशिक याने केलं आहे. या टीझरवरून हे स्पष्ट होतंय की,‘भूल भुलैया ३’ विनोदापेक्षा भयपटाकडे अधिक झुकतो. या प्रकारातील ‘स्त्री २’च्या यशामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटांबद्दल रस वाढला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -