मुंबई: आहारामध्ये माशांना हेल्दी फूड म्हटले जाते. यात अनेक पोषकतत्वे आढळतात. यात हाय क्वालिटी प्रोटनसह ओमेगा ३ फॅटी अॅसिड, व्हिटामिन डी, व्हिटामिन बी २, आर्यन, झिंक, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे हेल्दी फॅट आढळतात. माशांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच डिप्रेशन आणि टाईप १ डायबिटीजचा धोकाही कमी होतो.
जाणून घ्या मासे खाण्याचे भरपूर फायदे
मेंदूसाठी फायदेशीर
रिसर्चनुसार, माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सोबतच मानवाच्या मेंदूमध्ये आढळणारे मेम्ब्रेन n-3 FAs साठी मासे चांगले मानले जातात. याशिवाय मासे वृद्ध माणसांमध्ये डिमेंशिया सारख्या विसरण्याचे आजार दूर करतात. प्रेग्नंसीदरम्यान मासे खाणेही चांगले असते यामुळे बाळाचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.
तणाव होतो दूर
मासे खाल्ल्याने केवळ शारिरीकच नव्हे तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. जे लोक दररोज माशांचे सेवन करतात त्यांना मेंदूशी संबंधित आजार होत नाहीत. सोबतच मासे तणाव, एंझायटी कमी करण्याचे काम करतात.
हृदयाशी संबंधित आजारांसाठी चांगले
हृदयाच्या रुग्णांसाठी मासे अतिशय फायदेशीर आहेत. यात आढळणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड हृदयाचे आरोग्य मजबूत बनवते. ओमेगा ३ ट्रायग्लिसराईडचा धोकाही कमी होतो.
अस्थमापासून सुटका
माशांमध्ये एन ३ ऑईल आढळते जे अस्थमाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले
तज्ञांच्या मते, माशांमध्ये आढळणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करतात.