मुंबई: जगात असे काही देश आहेत जे केवळ पर्यटनातून काही खास पैसे कमावत आहे. त्यांच्या या कमाईमध्ये आपल्या भारतीयांचाही मोठा वाटा आहे. लाखोंच्या संख्येने भारतीय दरवर्षी दुसऱ्या देशांमध्ये फिरण्यासाठी जातात. या कारणामुळे दुसऱ्या देशाच्या टूरिझ्ममधून चांगली कमाई होते. या देशांमध्ये फ्री एंट्री व्हिजा मिळतो.
भारताच्या जवळील भूटान हा देश आहे. येथे तुम्ही आरामात ५० हजारांत फिरू शकता. कारण या ठिकाणी फिरणे स्वस्त आहे. सगळ्यात चांगली बाब म्हणजे येथे भारतीयांना १५ दिवसांसाठी व्हिसा फ्री एंट्री मिळते. हिमालयात वसलेला हा देश हिरवळ, बर्फाचे टोक, मठ तसेच गजब संस्कृतीसाठी ओळखला जातो.
हिंद महासागराच्या मधोमध असलेले मॉरिशस अतिशय सुंदर आहे. येथेही तुमच्या बजेटमध्ये आरामात तुम्ही ५० ते १ लाखापर्यंत फिरू शकता. येथे व्हिसाची झंझट नाही.
थायलंड दक्षिण आशियातील स्वर्ग आहे. येथे तुम्ही आरामात फिरू शकता. येथे तुम्ही कमी बजेटमध्ये फिरू शकता. येथे भव्य मंदिरे आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
कॅरेबियन देश जे नेचर आयलँड येथे भारतीयांचे आवडते आयलँड आहेत. पिटॉन्स नॅशनल पार्कमध्ये तुम्ही १३४२ मीटर उंच ज्वालामुखी पाहू शकता. येथे तुम्ही ५०-१ लाखापर्यंत आरामात फिरू शकता.