Saturday, May 10, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Team India: कानपूर कसोटीत ३ स्पिनर की ३ पेसर? प्लेईंग ११वर टीम इंडियाचा सस्पेन्स

Team India: कानपूर कसोटीत ३ स्पिनर की ३ पेसर? प्लेईंग ११वर टीम इंडियाचा सस्पेन्स

मुंबई: कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये २७ सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ३ स्पिनरसोबत उतरणार आहे की तीन वेगवान गोलंदाजांसोबत उतरणार? यावर सन्पेन्स कायम आहे. खरंतर, टीम इंडियाच्या असिस्टंट कोचने सामन्याच्या आधी प्रेस कॉन्फरन्समध्ये टीम कॉम्बिनेशनबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.


उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सामन्यासाठी दोन पिच तयार केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीरने ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑप्शन प्रॅक्टिसदरम्यान दोन्ही पिचचे निरीक्षण केले. पहिल्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पावसाची भविष्यवाणी करण्यात आली आहे.


भारताने चेन्नईत दोन स्पिनर आणि तीन वेगवान गोलंदाजांसोबत खेळ केला होता. जर भारत कानपूरमध्ये तीन स्पिनर्ससोबत खेळण्याचा पर्याय निवडत असेल तर अतिरिक्त स्पिनर अक्षर पटेल अथवा कुलदीप यादव यांच्यापैकी एक असू शकतो.



भारतीय संघ


रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत(विकेटकीपर), ध्रुव जुरेल, आर. अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.

Comments
Add Comment