Sunday, November 2, 2025
Happy Diwali

७ दिवसानंतर सुरू होतेय शारदीय नवरात्री, ९ दिवस करू नका या चुका

७ दिवसानंतर सुरू होतेय शारदीय नवरात्री, ९ दिवस करू नका या चुका

मुंबई: यावेळेस शारदीय नवरात्री ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. याचे समापन १२ ऑक्टोबरला विजयादशमीच्या दिवशी होईल. यावेळेस यावेळेस दुर्गा माता पालखीमधून येत आहेत. भक्त नवरात्रीत दुर्गा मातेच्या नावाचे व्रत ठेवतात.

ज्योतिषांच्या मते, शारदीय नवरात्रीमध्ये काही चुकांपासून दूर राहिले पाहिजे. जर तुम्ही नवरात्रीत दुर्गा मातेची उपासना करायची असेल तर घराची चांगल्या पद्धतीने सफाई करा. तसेच घरातील मंदिरही साफ करा. घरात कोणत्याही प्रकारची घाण असता कामा नये.

शारदीय नवरात्रीच्या आधी घरी अनुपयोगी वस्तू जसे खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू हटवा, या सर्वांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.

याशिवाय घरातील मंदिरामध्ये माता दुर्गेचे छोटे चित्र अथवा फोटो ठेवा. याचा आकार तुमच्या अंगठ्याएवढा असावा. नवरात्रीत दुर्गा मातेची पुजा करत असल्यास तामसी भोजनपासून दूर राहा. यामुळे ९ दिवस सात्विक भोजन करा. दुर्गा मातेच्या पुजनाआधी नेहमी स्नान करून मंदिरात प्रवेश करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा. याशिवाय दुर्गा मातेला अपवित्र भोग अर्पण करा. तर स्वच्छतेने बनवलेले नैवेद्य दुर्गा मातेला अर्पण करा. जर तुम्ही नवरात्रीत अखंड ज्योती पेटवत असाल तर संपूर्ण ९ दिवस अखंड ज्योती लावा. तो विझला नाही पाहिजे.  
Comments
Add Comment