Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीYek Number Movie Trailer : 'येक नंबर' चित्रपटाचा ट्रेलर पहिला का ?...

Yek Number Movie Trailer : ‘येक नंबर’ चित्रपटाचा ट्रेलर पहिला का ? राज ठाकरे म्हणाले…

‘येक नंबर’ (Yek Number) या चित्रपटाचे पोस्टर गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाले आहे. अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली असतानाच आता ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी ‘येक नंबर’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. दिग्दर्शित राजेश मापुस्कर या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत.

नुकताच झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’ या चित्रपटाचा भव्य असा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज ठाकरे, दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर, बॉलिवूड अभिनेता आमिर खान, अविनाश गोवारीकर, साजिद नाडियाडवाला, साजिद खान, अभिजात जोशी या लोकांची प्रमुख उपस्थिती होती.

राज ठाकरे स्वतः या चित्रपटात अभिनय करणार आहेत का?

या चित्रपटाच्या पोस्टरपासूनच खरंतर हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. अखेर ट्रेलर पाहून या चर्चेला पूर्णविराम लागला असून आपल्या प्रेमकहाणीला पूर्ण करण्यासाठी गावामध्ये राज ठाकरे यांना घेऊन येण्यासाठी मुंबईत निघालेल्या एका सामान्य तरुणाची असामान्य कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं दिसत आहे. प्रतापचा राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा संघर्षमयी प्रवास या ट्रेलरमध्ये दाखवला आहे. आता प्रताप त्याचे ध्येय साध्य करू शकेल का? या प्रश्नांचा उलगडा येत्या १० ऑक्टोबरला होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. ती म्हणजे अशी की, राज ठाकरे स्वतः या चित्रपटात अभिनय करणार आहेत का? तर याचे उत्तरही प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.

दरम्यान, या ‘येक नंबर’ चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिची देखील एक सुंदर झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मलायका आरोराने ‘येक नंबर’ या चित्रपटामधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. तर या चित्रपटात लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवही झळकणार आहे. याआधी चित्रपटातील ‘जाहीर झालं जगाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सध्या या गाण्याची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. ‘येक नंबर’ हा चित्रपट म्हणजे एक कौटुंबिक, रोमँटिक लव्हस्टोरी, सस्पेन्स असे मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असणार आहे जे पाहायला मिळणार आहे, इतकं नक्की!

‘येक नंबर’ चित्रपटाबाबत राज ठाकरे काय म्हणाले?

चित्रपटाबद्दल राज ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे इतर सर्व भाषेत भव्य चित्रपट बनत आहेत. तसेच आपल्या मराठीतही मोठे चित्रपट व्हावेत, असे आम्हाला सगळ्यांनाच वाटायचे आणि त्यातूनच ‘येक नंबर’ हा चित्रपट उभा राहिला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. काही नावे मी आवर्जून घेईन, त्यात आशुतोष गोवारीकर, राजकुमार हिरानी यांचे विशेष आभार, वेळोवेळी आम्हाला त्यांचे सहकार्य या चित्रपटासाठी लाभले. ‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ या संपूर्ण टीम एका वाक्यावर या चित्रपटाचा भाग झाली आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी सादर केली आहे.

या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

झी स्टुडिओज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित, ‘येक नंबर’चे तेजस्विनी पंडित, वर्धा नाडियाडवाला निर्माते आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -