Monday, February 16, 2026

मुंबईत मुसळधार; मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू

मुंबईत मुसळधार; मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू

कल्याण तालुक्यात वीज पडून दोन कामगारांचा मृत्यू

मुंबई : मुसळधार पावसात कामावरून घरी परतणाऱ्या एका महिलेचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला. अंधेरी येथील सिप्झ परिसरात, गेट क्रमांक-३ समोर, महिलेला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या महिलेचे नाव विमल अप्पाशा गायकवाड होते. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

या महिलेच्या बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने शोध मोहीम हाती घेतली आणि एक तासानंतर तिचा मृतदेह नाल्यातून शंभर ते दीडशे मीटर अंतरावर सापडला.

मेट्रोचे काम सुरू असलेल्या परिसरात ड्रेनेजचे झाकण उघडे होते, आणि महिला त्यामध्ये पडून वाहून गेली होती. या दुर्घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.

घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी दाखल झाले होते.

कल्याण तालुक्यात वीज पडून दोन कामगारांचा मृत्यू

दुसरीकडे, कल्याण तालुक्यात वीज पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला. कांबा परिसरातील खदाणीत काम करत असताना राजन यादव आणि बंदनाराम मुंडा या दोन कामगारांचा विजेने मृत्यू झाला. या घटनेचा तपास टिटवाळा पोलिसांनी सुरू केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >