Saturday, July 5, 2025

Haji Ali Dargah : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी, फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

Haji Ali Dargah : हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी, फोन करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : ताडदेव पोलिसांत हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा फोन बुधवारी सायंकाळी आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव पवन असल्याचं सांगितलं होतं. ताडदेव पोलिसांकडून आता पुढील तपास करत आहेत.




अर्वाच्च भाषेत शिवीगाळ


हाजी अली दर्गाच्या ट्रस्ट कार्यालयामध्ये एक धमकीचा फोन आला होता. हाजी अली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती देत फोन करणाऱ्या व्यक्तीने तातडीने दर्गा खाली करण्यास सांगितले. दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवला असून बॉम्ब स्फोट केला जाईल. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा फोन हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयामध्ये फोनवर आला होता. तसेच आरोपीने फोनवर स्वत:चं नाव पवन असे सांगत घाणेरड्या पद्धतीने शिवीगाळ करत दर्ग्याविषयी वादग्रस्त वक्तव्यही केली.


या प्रकरणी हाजी अली दर्गाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ताडदेव पोलिस ठाण्यात फोन करणाऱ्या व्यक्ती विरोधात कलम 351(2), 352, 353(2), 353(3), भादवी 2023 अंतर्गत गुन्हा दाखल ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणी ताडदेव पोलिस अधिक तपास करत आहेत.


धमकी देणाऱ्या व्यक्तीचा कॉल करण्यामागचा काय हेतू होता याचा तपास पोलिस करत आहेत. हा फोन करणारा व्यक्ती हा कुणीतरी मानसिक रुग्ण असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.


Comments
Add Comment