Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis: भय्या! "देवेंदर नहीं, देवेंद्र.. ; फडणवीसांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा!

Devendra Fadnavis: भय्या! “देवेंदर नहीं, देवेंद्र.. ; फडणवीसांच्या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हशा!

मुंबई : महाराष्ट्रामधील भाजपाचे सर्वात महत्त्वाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अभ्यासू वृत्ती व हजरजबाबीपणा सर्वशृतच आहे. प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसते तशीच ती विधानसभेच्या पटलावरही मुद्दा समजावून सांगण्याची त्यांची हातोटी दिसून येते. देवेंद्र फडणवीस अत्यंत क्लिष्ट व अडचणीच्या राजकीय प्रश्नांवरही अनेकदा मुलाखतींमध्ये याच वृत्तीमुळे मिश्किलपणे उत्तर देताना आढळतात. त्यांचा हाच स्वभाव नुकत्याच त्यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये दिसून आला.

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक सविस्तर मुलाखत दिली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यांवर या मुलाखतीमध्ये त्यांनी भाष्य केलं. त्यात अजित पवारांशी केलेली युती, लोकसभा निवडणुकीतील अपयश, त्यानंतरची टीका, विधानसभा निवडणुकीची तयारी अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांनी सविस्तर उत्तरं दिली. मात्र, मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्यांनी केलेल्या एका मिश्किल टिप्पणीवर सर्व उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!

देवेंदर नाही, देवेंद्र!

मुलाखतीच्या सुरुवातीलाच मुलाखतकार पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांची ओळख करून देताना व त्यांना संबोधताना ‘देवेंद्र’ असं न म्हणता ‘देवेंदर भाई’ म्हणून उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रश्न पुढे पूर्ण करण्याआधीच त्यांना हटकलं. “एक रिक्वेस्ट करता हूँ. देवेंदर नहीं, देवेंद्र. शुद्ध मराठी आदमी हूँ भय्या”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हास्य बहरून आलं. फडणवीसांच्या या हजरजबाबीपणाला प्रश्न विचारणाऱ्यांनी खळखळून हसून दाद दिली.

दरम्यान, यावेळी लोकसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत त्यांनी वक्तव्य केलं. या निवडणुकीत भाजपाच्या राज्यातील जागा २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. त्यावरून भाजपामध्ये कामगिरीबाबत चर्चा सुरू झाली असताना फडणवीसांनी त्यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडली. राज्यात भाजपा कमजोर झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -