Monday, October 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअक्षय शिंदे एन्कांऊटरचा तपास सीबीआयकडे

अक्षय शिंदे एन्कांऊटरचा तपास सीबीआयकडे

राज्य सरकारने दिली न्यायालयात माहिती

मुंबई : राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लहान मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा अचानक पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली. मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे निर्देश दिलेत. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. यातच अक्षय शिंदेचा दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

अक्षयच्या वडिलांच्या वकिलांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्ही माननीय न्यायालयाला विनंती केली आहे की, बदलापूरमध्ये अक्षय शिंदेच्या मृतदेहाचा दफनविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. कारण मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नाही. त्या विषयावर सरकारच्या वतीने सांगितले की आम्ही त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ. पण जागा मिळालेली नाही. सकाळी पुन्हा एकदा अक्षय शिंदेच्या आई वडिलांना बोलवण्यात आले होते. दोन ते तीन ठिकाणी त्यांना जागा दाखवण्यात येईल, असे ते म्हणाले.

आई-वडीलांना संरक्षण देण्याची मागणी

अक्षय शिंदेच्या आई वडिलांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांनी संरक्षण मागितले आहे. अक्षय शिंदेच्या आई वडिलांना संरक्षण दिले जावे, अशी मागणी आम्ही न्यायालयात केली आहे. किरीट सोमय्यांना जसे संरक्षण दिले तसेच अक्षय शिंदेच्या आई वडिलांना सुरक्षा द्यावी. कारण त्यांच्यावर आधीही हल्ला झाला आहे. अक्षय शिंदेने नेमके काय केले? चार्जशीटच समोर आलेली नाही. शाळेचे मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही हे सरकारचे अपयश आहे, असे वकिलांनी सांगितले.

पोलिसांच्या भूमिकेवर न्यायालयाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

दरम्यान, पोलिसांनी अक्षय शिंदेच्या थेट डोक्यातच गोळी का मारली, अक्षयने जेव्हा पोलिसांकडून पिस्तूल हिसकावून घेतले तेव्हा त्याला ते अनलॉक कसे करता आले, त्याला बंदूक चालवता येत होती का, अशा असंख्य प्रश्नांच्या फैरी झाडत उच्च न्यायालयाने बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत झाला प्रकार एन्काउंटर असूच शकत नाही, असे परखड मत नोंदविले होते.

योग्य जागा मिळताच दफन करणार

अक्षयच्या दफनासाठी बदलापूर परिसरात जमीन उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी अक्षयचे नातेवाईक आणि अक्षयचे वकील कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आले होते. यावेळी सरकार पक्षाने पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसे आदेश पोलीस उपायुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे बदलापूर पोलिसांनी अक्षयच्या नातेवाईकांना बदलापूर परिसरात दोन ते तीन जागा अक्षयच्या दफनासाठी दाखविण्याची तयारी केली आहे. दफनासाठी योग्य जागा मिळाली तर त्या जागेवर अक्षयचे दफन केले जाईल, असे ॲड. कटारनवरे यांनी सांगितले.

तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का?

कायद्याचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती त्वरीत झाली पाहिजे, असे ही वैयक्तिकरित्या मानतो. आम्ही चकमकींवर विश्वास ठेवत नाही; पण जर आरोपीने पोलिसांवर गोळी झाडली तर आमचे पोलीस टाळ्या वाजवणार का, असा सवाल करत बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीने पोलिसांवर हल्ला झाला म्हणून त्यांनी स्वसंरक्षणार्थ आरोपींवर गोळ्या झाडल्या. अशा घटनांचा गौरव केला जाऊ नये आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल, आम्ही चकमकींवर विश्वास ठेवत नाही. कायद्याचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यानुसार, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि ती त्वरीत झाली पाहिजे, असे मी वैयक्तिकरित्या मानतो, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -