Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीBank Job : बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; 'असा' करा अर्ज

Bank Job : बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; ‘असा’ करा अर्ज

मुंबई : सध्या अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय निर्यात-आर्यात बँक (EXIM Bank) मध्ये ऑफिसर पदासाठी भरती जारी करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून भरघोस पगारदेखील मिळणार आहे. त्यामुळे बँकेत ऑफिसर होण्याची इच्छुक असणाऱ्यासांठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

एक्झिम बँकेतील ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहे. या नोकरीसाठी एकूण ८८ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. तर १४ ऑक्टोबर २०२४ या तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. २७ ते ६५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा एमबीए पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही वर्षांचा अनुभव असावा. अनुभवानुसार उमेदवारांची योग्य पदासाठी निवड केली जाणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी समिती तयार केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.

अर्ज कसा करावा?

  • एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे eximbankindia.in वर जावे.
  • त्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल.
  • त्याचसोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
  • यानंतर उमेदवारांनी आपला फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर उमेदवारांनी या फॉर्मची प्रिंट आउट काढावी.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -