मुंबई: या वर्षी जुलै महिन्यात भारताच्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी आपापल्या रिचार्ज प्लान्समध्ये वाढ केली होती. या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोनआयडिया यांच्या नावाचा समावेश आहे. या तीन कंपन्यांनी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही पद्धतीच्या प्लान्सच्या किंमतीत वाढ केली.
रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेक युजर्सला आजपर्यंत हे समजलेले नाही की स्वस्त प्लान्स किती रूपयांचे आहे. यात आम्ही तुम्हाला जिओच्या स्वस्त प्लान्सबद्दल सांगत आहोत. यामुळे महिन्याभराचे टेन्शन कमी होईल.
१८९ रूपयांचा प्लान
हा प्लान आधी १५५ रूपयांचा होता मात्र याची किंमत १८९ रूपये झाली आहे. या प्लानच्या सुविधा
डेटा: २जीबी डेटा
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस
२४९ रूपयांचा प्लान
हा प्लान आधी २०९ रूपयांचा होता. याची किंमत आता २४९ रूपये झाली आहे. यातील सुविधा
डेटा: १ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस
२९९ रूपयांचा प्लान
हा प्लान आधी २३९ रूपयांचा होता मात्र आता याची किंमत २९९ रूपये झाली आहे. या प्लानमधील सुविधा
डेटा: १.५ जीबी प्रतिदिन
व्हॉईस कॉलिंग: अनलिमिटेड व्हॉईस कॉल्स
SMS: अनलिमिटेड SMS
व्हॅलिडिटी: २८ दिवस
हे सध्याच्या घडीला जिओचे सगळ्यात कमी रिचार्जवाले प्लान्स आहेत. यांची व्हॅलिडिटी २८ दिवसांची आहे. जर तुम्ही फोनसाठी २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान शोधत आहोत तर तुम्हाला कमीत कमी १८९ रूपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान खरेदी करावा लागेल.