Sunday, October 6, 2024
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात आता मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याने सगळीकडे दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, पुणेसह विदर्भातही गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. बुधवारी झालेल्या पावसाने शहरी भागात वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरावस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आजही राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आले आहेत.

राज्याला गेले तीन महिने झोडपून काढणारा पाऊस आता परतीच्या प्रवासातही रौद्र स्वरुप धारण करत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. यामुळे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

वायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सोमवारपासून सुरू झाला आहे. यंदा सलग १४ व्या दिवशी परतीचा प्रवास विलंबाने सुरू झाला. सामान्यपणे १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरू होतो. यंदा सात दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून कोकण, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण या ठिकाणी बादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून राज्यातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

मुंबई आणि कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, घाराशीव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली,नांदेड या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -