मुंबई: आयसीसी रँकिंगमध्ये(icc ranking) भारताचा फलंदाज विराट कोहली(virat kohli) आणि रोहित शर्मा(rohit sharma) यांना मोठे नुकसान झाले आहे. दोघेही भारतीय सुपरस्टार ताज्या रँकिंगनुसार कसोटीत ५-५ स्थानांनी घसरले आहेत. तर दुसरीकडे सलामीचे फलंदाज यशस्वी जायसवालला मोठा फायदा झाला आहे. याशिवाय ऋषभ पंत कसोटीच्या रँकिंगमध्ये जायसवालपेक्षा केवळ एका स्थानाने खाली आहे. जायसवाल तीनही फॉरमॅटच्या रँकिंगमध्ये टॉप ५मध्ये राहणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कसोटीच्या फलंदाजीच्या रँकिंगमध्ये पाच स्थानांनी घसरण झाल्याने ७१६ पॉईंट्ससह १०व्या स्थानावर काबीज झाला आहे. याशिवाय विराट कोहली ५व्या स्थानांनी घसरून ७०६ पॉईंट्ससोबत १२व्या रँकिंगवर पोहोचला आहे.
कसोटी रँकिंगमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूट अव्वल स्थानावर आहे. रूटकडे ८९९ पॉईँट्स आहेत. याशिवाय वनडेच्या बॅटिंग रँकिंगमध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आणि विराट कोहली ४ नंबरवर आहे. तर शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर आहे.
इतर टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाजीच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड ८८१ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव ८०५ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.यानंतर इंग्लंडचा फिल सॉल्ट तिसऱ्या आणि भारताचा यशस्वी जायसवाल ७५७ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ७५५ रेटिंगसोबत पाचव्या स्थानावर आहे.
गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये भारताचा कब्जा
कसोटीच्या गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये भारताचा स्टार स्पिनर रवीचंद्रन अश्विन ८७१ रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराह ८५४ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर वनडेच्या फलंदाजीच्या रँकिंग पाहिल्यास भारताचे कुलदीप यादव ६६५ रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे. कुलदीप वनडे बॉलिंगच्या रँकिंगमध्ये टॉप ५मध्ये राहाणार एकमेव भारतीय आहे. तर टी-२० आंतरराष्ट्रीय बॉलिंग रँकिंगमध्ये कोणताही भारतीय गोलंदाज टॉप ५च्या रँकिंगमध्ये नाही.