Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

Airtelचा धमाका, spam calls आणि SMS पासून होईल सुटका

मुंबई: spam calls आणि SMS ही एक मोठी समस्या आहे. या कॉल्समुळे मोठ्या संख्येने लोक त्रस्त झाले आहेत. तसेच याची तक्रार करत आहेत. हा त्रास दूर करण्यासाठी airtelने खास पाऊल उचलले आहे. कंपनीने आर्टिफिशिय इंटेलिजन्स पावर्ड स्पॅम डिटेक्शन सॉल्युशन रिलीज केले आहे.


ही सर्व्हिस एआयच्या मदतीने एअरटेलच्या ग्राहकांना संभाव्य spam calls आणि SMS पासून वाचवेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे सॉल्युशन स्पॅम कॉल्स आणि मेसेजची रिअल टाईम माहिती युजर्सला मिळेल. ही सर्व्हिस प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांना मिळेल.



नाही देणार कोणताही चार्ज


या सर्व्हिससाठी ग्राहकांना वेगळा चार्ज द्यावा लागणार नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट असेल.ऑटोमॅटिक अॅक्टिव्हेट होईल. एअरटेलच्या ग्राहकांना या सर्व्हिसचा फायदा कोणत्याही रिक्वेस्ट अथवा अॅपला डाऊनला करून वापर करू शकाल. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे फीचर्स स्मार्टफोनर काम करेल.


हे फक्त VoLTE कॉलवर काम करेल. नुकतेच ट्रायने टेलिकॉम कॅरियर्सला ठोस पावले उचलण्यास सांगितले होते. सातत्याने वाढते टेलिकॉम कॉल्स आणि ग्राहकांची असंतुष्टता लक्षात घेता ऑथॉरिटीने टेलिकॉम कंपन्यांना कडक पावले उचलण्यास सांगितले होते.

Comments
Add Comment