Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीDevendra Fadnavis On Maratha Reservation : “दुर्दैवाने ते टिकू शकले नाही, मात्र…”;...

Devendra Fadnavis On Maratha Reservation : “दुर्दैवाने ते टिकू शकले नाही, मात्र…”; मराठा आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीसांच सुस्पष्ट विधान

नवी मुंबई : मराठा समाज हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवी मुंबईत बोलताना एक मोठं वक्तव्य केलय. “मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं, असं आमच्या सरकारचं वचन आहे. मराठा समाजाच्या या मागण्या योग्य आहेत. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची ९१ वी जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हजेरी लावली. यावेळी इथे माथाडी कामगारांचा भव्य मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल एक मोठे वक्तव्य केले.

“त्यानंतर ते दुर्दैवाने टिकू शकले नाही”

“ अण्णासाहेब पाटील यांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी आपण इथे जमतो. अण्णासाहेब पाटील यांच्या निमित्तानेच मराठा समाजाची चळवळ उभी झाली. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. देशात मराठा आरक्षण हे एकमेव आरक्षण होते, जे उच्च न्यायालयात आपण टिकवून दाखवलं. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा सर्वोच्च न्यायालयातही ते टिकलं. पण दुर्दैवाने त्यानंतर ते टिकू शकले नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठा समाजाची पिळवणूक आणि फरफट होता कामा नये”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुन्हा १० टक्के आरक्षण दिलं. मोदींनीही EWS चे आरक्षण दिलं. मराठा समाजाला त्याचाही फायदा झाला. मात्र आता सातत्याने वेगळ्या आरक्षणाची मागणी होत असल्याने शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही १० टक्के आरक्षण दिले. वेगवेगळ्या मागण्या आज होत आहेत, त्या चुकीच्या आहेत असं मी म्हणणार नाही. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण जी कोणतीही मागणी मागतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे, अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायाचा आणि कायद्याच्या चौकटी बसला नाही म्हणून न्यायालयाने तो निर्णय रद्द करायचा, अशाप्रकारची वारंवार पिळवणूक आणि फरफट मराठा समाजाची होता कामा नये. त्यामुळेच यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्हीसुद्धा करत आहोत”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हंटल.

“मराठा समाजाला त्यांचा हक्क मिळायला हवं”

“मराठा समाजाने विविध समाजाचे नेतृत्व केलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे १८ पगड जातीचे मावळे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत, महाराष्ट्रासाठी अशाप्रकारचे चित्र उभं राहणं हे योग्य नाही. ते उभं होऊ नये, असा सर्वांचाच प्रयत्न आहे. त्यामुळे मराठा समाजाला त्यांचे अधिकार आणि आरक्षण हे मिळायलाच हवं हे आमच्या सरकारचे वचन आहे. पोलीस भरतीमधेही मराठा आरक्षण दिले. मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळायला हवं, तसेच त्यावेळी समाजामध्ये कुठेही दुफळी निर्माण होऊ नये. आमचा या दृष्टीने सातत्याने प्रयत्न आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -