मुंबई: तुम्ही घरात वडीलधाऱ्या माणसांकडून ऐकले असेल की तांब्याच्या भांड्यात पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साधारणपणे लोक रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवतात आणि हे पाणी सकाळी उठल्यानंतर पितात.
मात्र तुम्हाला माहीत आहे का की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात. तसेच हे पाणी पिणे अतिशय फायदेशीर आहे.
तज्ञांच्या मते, तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी अँटी ऑक्सिडंटने भरपूर असते. दररोज सकाळी हे पाणी प्यायल्याने फ्री रॅडिकल्सपासून सुटका मिळते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरात मेलानिनचे उत्पादन होते. हे कंपाऊंड आपल्याला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो.
तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने शरीरात इलास्टिन आणि कोलॅजनची निर्मिती होते. इलास्टिन आणि कोलाजन स्किनसाठी अतिशय फायदेशीर असते. यामुळे त्वचा तरूण राहण्यास मदत होते. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगले होते. यामुळे पाचनतंत्र योग्य राहते. तसेच वजनही नियंत्रणात राहते.
शरीराची रोगप्रतिकारक क्षमता म्हणजेच इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी फायदेशीर ठरते.