भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेत भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज गुळवी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेसमोर तीव्र धरणे आंदोलन करण्यात आल आहे. प्रतिबंधक विभागाने लाचलुचपत प्रशासकीय राजवटीत दोन वेळा महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक केली, असे असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्या ऐवजी त्यांना पदोन्नती दिली जात असल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लाचखोर भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासन मेहर नजर ठेवत असून त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली आहे.
‘त्वरित निलंबित करा’…या मागणीसाठी मनसेचे धरणे आंदोलन
