दौऱ्यावर टीका करणाऱ्या उबाठाच्या राऊतांना आमदार नितेश राणेंनी सुनावले
कणकवली : देशाचे गृहमंत्री, भाजप नेते अमित शाह (Amit Shah) नाशिक दौऱ्यावर आहेत त्यामुळे उबाठा (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतला मिरच्या लागत आहेत. भाजप कार्यकर्ता मोठ्या पदावर गेला तरी पक्ष आणि संघटनेसाठीची निष्ठा गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून ठाकरे आणि राऊत यांनी शिकावी. तुला आणि घर कोंबड्या मालकाला अमितभाई यांचे कर्तृत्व आणि पक्ष निष्ठा समजणार नाही.तुझ्या मालकाने शिवसैनिकांना,आमदार आणि जिल्हा प्रमुखांना मुख्यमंत्री असताना भेट दिली असती तर पक्ष फुटला नसता आणि तुमची अशी अवस्था झाली नसती. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अमितभाई शाह यांचा आदर्श घ्यावा असा सल्ला भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.
कणकवली येथे ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले,अमित शाह हे जेष्ठ नेते असून बलवान व कार्यतत्पर नेते आहेत. त्यांच्याकडे देशासाठी आणि पक्षासाठी वेळ आहे.त्यांनी देश हिताचे जे निर्णय घेतले त्या नंतर जनतेने देशभर ते स्वीकारले म्हणून आज देशात शांतता आहे. त्यामुळे संजय राऊतने लडाख, काश्मीरपेक्षा पत्राचाळीत जाऊन सभा घ्यावी मग त्याला चप्पल पडतील आणि स्वतःची लायकी कळेल. २०१४ पासून अमित शाह येत आहेत. तुझा मालक भेटीला जायचा तेव्हा तुम्हाला त्यांच्या दौऱ्यांचा फायदा व्हायचा आता तुमचा पराभव होणार असल्यामुळे अमित शाह यांच्या दौऱ्याची भीती उबाठा पक्षाला वाटू लागली आहे. ज्यांची वापरा आणी फेका यात संजय राऊत याचा मालक उद्धव ठाकरे यांची पी एच डी झालेली आहे. त्यांनी तर सख्खा भाऊ चुलत भाऊ यांचा वापर करून फेकून दिले. शिवसेनेचे नेते असलेले एकनाथ शिंदे, राणे साहेब, गणेश नाईक, चुलत भाऊ राज ठाकरे, स्वतःचा सख्खा भाऊ यांच्या हव तेव्हा वापर केला आणि फेकले.भाजप हा मित्र पक्षांना घेवून त्यांना मोठे करणारा आहे.संजय राऊतने “मुंगेरी लाल चे हसीन सपने” पाहू नयेत. भाजप आणि महायुतीचे पुन्हा सरकार येणार आहे.आणि संजय राऊत आमच्या मिरवणुकीत नाचणार सुद्धा आहे असा टोला लगावला.
अक्षय शिंदे संत-महात्मा होता का? त्याला पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षे साठी मारला तर ठाकरे, तुतारी वाले,काँग्रेस यांना दुःख का झाले. तुम्हाला पोलिसांचे बळी पाहिजे होते काय? कोणाची बाजू घेता ? यांचा तरी विरोधकांनी विचारा करावा अशा शब्दात सुनावले. राजकोट दुर्घटना घडली त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री यांनी शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारला जाईल. असे जाहिर केले होते. पहिल्या झालेल्या चुका आता होणार नाही. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल असा शिवरायांचा पुतळा निर्माण होईल. असेही एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले.