मुंबई: शुक्रने आज पाप ग्रह राहूच्या नक्षत्रात प्रवेश केला आहे. शुक्रने आज दुपारी साधारण सवा एक वाजता राहुचे स्वामित्व असलेल्या स्वाती नक्षत्रात प्रवेश केला आहे.
ज्योतिषगणनेनुसार स्वाती नक्षत्रामध्ये शुक्र ५ ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहणार आहे. या दरम्यान शुक्र तीन राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम देऊ शकतात.
मिथुन – व्यापारात वृद्धी होण्यासोबतच आरोग्यात सुधारणा होण्याची प्रबळ शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील आणि आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीपेशामध्ये इन्क्रिमेंट अथवा प्रमोशनची बातमी मिळू शकते. दीर्घकाळापासून सुरू असलेला अडथळा लवकरच दूर होईल.
कुंभ – जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे तर तुम्हाला अपार धन प्राप्ती होऊ शकते. कर्जापासून सुटका मिळू शकते. खर्चामध्ये कमी येईल. वैवाहिक जीवन अथवा प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल. कुंडलीत विवाहाचे योग बनत आहेत. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.
मीन – व्यापाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यापारी वर्गाच्या लोकांना अधिक फायदा वाढू शकतो. एखादी चांगली डील मिळू शकते. नोकरीपेशा लोकांसाठी ही वेळ चांगली आहे. करिअरमध्ये चांगला बदल येऊ शकतो. विचार केलेल्या योजना पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील.