मुंबई: भारतात सर्व आई-वडील आपल्या मुलांसोबत एकत्र झोपतात. अनेक बाबतीत असे करणे योग्य मानले जाते मात्र एका वयानंतर आई-वडिलांनी असे करणे बंद केले पाहिजे.
अशातच असा सवाल येतो की मुलांना कोणत्या वयानंतर आईवडिलांसोबत झोपवू नये. तज्ञांच्या मते प्री-प्युबर्टी असा काळ असते जेव्हा आई-वडिलांनी मुलांसोबत झोपणे बंद केले पाहिजे. त्यांना वेगळ्या बेडवर झोपवले पाहिजे.
प्युबर्टी सुरू होण्याचे वय मुलींमध्ये ११ वर्षे आणि मुलांमध्ये १२ वर्षे असते. दरम्यान, मुलींमध्ये ८ वर्षांपासून १३व्या वर्षादरम्यान प्युबर्टी सुरू होणे सामान्य आहे. तर मुलांमध्ये हे वय ९ वर्षे ते १४ वर्षादरम्यान असते.
प्युबर्टीदरम्यान मुलांच्या शरीरात अनेक पद्धतीचे बदल होत असतात. अशातच पालकांनी आपल्या मुलांना स्पेस देणे गरजेचे असते. मुलाला वेगळे झोपताना हे लक्षात घ्या की तो अथवा ती व्यवस्थित झोपत आहे. जर तुमच्या मुलाला एकटे झोपायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्यासोबत झोपवू शकता. जर तुम्ही मुलांना एकाच बेडवर झोपवत असाल तर तुमच्या प्रायव्हसीवरही त्याचा परिणाम होतो.