मुंबई: आचार्य चाणक्य यांच्या मते व्यक्तीला तरुणपणी काही चुकांपासून नेहमीच दूर राहिले पाहजे. ज्यामुळे त्याला वार्धक्यामध्ये त्याचा त्रास होणार नाही. तरुणावस्थेत केलेल्या या चुका आपल्याला म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात.
आचार्य चाणक्य म्हणतात की यासाठी वेळेनुसारच या चुकांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते तरूणपणी व्यक्तीने वेळेची कदर केली पाहिजे. वेळ नेहमीच बलवान असते.
जी व्यक्ती वेळेचे भान ठेवत नाही त्या व्यक्तींना आयु्ष्यभर नेहमीच त्रास सहन करावा लागतो. वेळेला कधीही व्यर्थ घालवू नये. वेळेचे सदुपयोग नेहमी चांगली कामे शिकण्यासाठी केला पाहिजे.
आचार्य चाणक्य म्हणतात की तरूणपणात व्यक्तीला पैशांची समज असणे गरजेचे असते. जी व्यक्ती तरूणपणात पैशांचा योग्य वापर करणे शिकते त्यांना आयुष्यभर पैशांची चणचण भासत नाही.
तरूणपणात आळस कधीही करू नये. आळस करणारी व्यक्ती आयुष्यात कधीही यशस्वी होत नाही. आळस हा माणसाचा शत्रू असतो.