आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार; मुलुंड येथे भव्य मोर्चा

  75

मुलुंड : धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यात यावे. त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यामागणीसाठी तसेच पंढरपूर येथे उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवाना पाठींबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने मुलुंड येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.


दरम्यान, महाराष्ट्र राज्यात धनगड‌ जमात अस्तित्त्वात नसून त्या ऐवजी धनगर समाज आहेत, असे शपथपत्र राज्य सरकारने मुंबई उच्चन्यायालयात दिले आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढावा, मुंबई उच्च न्यायालयात धनगर एसटी आरक्षणाची केस सुरु होती. त्यामध्ये धनगड अस्तित्त्वात नाहीत, असे राज्य सरकारने शपथपत्र दिले होते. परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा या गावातील खिलारे नावाच्या बांधवांनी धनगडाचे बनावट दाखले काढल्याने धनगडाची राज्यातील शून्य संख्या अमान्य केली. म्हणून राज्य सरकारने तत्काळ धनगडाचे दाखले रद्द करावे, धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीचा जीआर राज्य सरकारने तत्काळ काढवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


महाराष्ट्रातील जिल्हाधिका-यांना निर्गमित करावा व धनगड जमात राज्यात अस्तित्त्वात नसून अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ नंबरला धनगड ऐवजी धनगर, असे गृहित धरुन धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे दाखले वितरीत करण्यात यावेत, अशा मागणीचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले. तसेच धनगर समाजाच्या या मागणीला स्थानिक आमदार म्हणून मिहीर कोटेजा यांनी पत्र काढून पाठींबा जाहीर करावा अशी विनंती देखील समाजबांधवानी आमदार मिहीर कोटेजा यांना निवेदन देऊन केली.


याप्रसंगी, सकल धनगर समाजाच्या सहभागी कार्यकर्त्यांनी सरकार विरुध्द जोरदार घोषणा देत एसटीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. अन्यथा आगामी काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता