मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी इराण कप २०२४ साठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडियाच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. ही टीम यासाठी चर्चेत आहे कारण यात अशा ३ खेळाडूंचा समावेश आहे ज्यांना बांगलादेशविरुद्ध निवडलेल्या भारतीय संघातून बाहेर करत इराणी कपमध्ये खेळण्यास सांगितले आहे. या ३ खेळाडूंना बाहेर केल्याने बांगलादेशला दुसरी कसोटी जिंकणे सोपे होईल?
भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरला कानपूरमध्ये खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मासह अनेक खेळाडू कानपूरमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेची खास काळजी घेतली जात आहे. पहिल्या सामन्यातील कामगिरी पाहिल्यानंतर दुसऱ्या कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे.
३ खेळाडू नाही खेळणार दुसरी कसोटी
या तीन खेळाडूंचे नाव सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल आहे. हे तीनही खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या १५ सदस्यीय संघात सामील होते. मात्र त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. आता इराणी कपच्या जबाबदारीचे कारण सर्फराज खान, ध्रुव आणि यश दुसऱ्या कसोटी मिस करणार आहे. एकीकडे सर्फराज खान मुंबई टीमसाठी खेळेल. दुसरीकडे ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना रेस्ट ऑफ इंडिया संघात स्थान मिळाले आहे.
श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते शार्दूल ठाकूरही भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची आशा आहे. हे सर्व खेळाडू इराणी कपमध्ये चांगली कामगिरी करत पुढील मालिकांसाठी टीम इंडियामध्ये स्थानासाठी दावेदारी ठोकू शकता.