मुंबई: बीएसएनएलने खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी आव्हान निर्माण केले आहे. मोबाईल सेवांसह सरकारी कंपनी ब्रॉडबँड प्लानमध्येही मोठी स्पर्धा निर्माण करत आहे. बीएसएनएलने ब्रॉडबँड इंटरनेट युजरसाठी अतिशय फायदेशीर प्लान सादर केले आहेत. यात ५००० जीबी डेटा उपलब्ध आहे. या योजनेमध्ये युजरला २०० एमबीपीएसच्या वेगवान स्पीडने इंटरनेटची सुविधा मिळत आहे.
बीसएनएलचा हा प्लान ९९९ रूपये प्रति महिना उपलब्ध आहे. यात युजरला एका महिन्यासाठी ५००० दीबी इंटरनेट डेटा मिळेल. या योजनेत २०० एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेटची सुविधा दिली जात आहे. डेटा संपल्यानंतर युजरला १० एमबीपीएसच्या स्पीडने अनलिमिटेड इंटरनेट मिळेल. या प्लानची खास बाब म्हणजे बीएसएनएल इन्स्टॉलेशन चार्ज घेत नाही आहे. यामुळे कोणत्याही खर्चाशिवाय तुम्ही ब्रॉडबँड सेवेचा आनंद घेऊ शकता.
अनेक ओटीटी अॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन
याशिवाय बीएसएनएल या ब्रॉडबँड प्लानसोबत युजरला अनेक ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. युजरला Disney Plus Hotstar, Sony LIV, Zee5, YuppTV, आणि Hungama सारख्या प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच या योजनेत संपूर्ण देशात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.