‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’चा किताब गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला आहे. इतर ५१ स्पर्धकांना रियाने मागे टाकत अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.
‘मिस युनिव्हर्स इंडिया 2024’च्या विजयानंतर आता ती ‘इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स 2024’ या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. राजस्थानमधील जयपूर याठिकाणी रविवारी ग्रँड फिनाले पार पडला होता.
रिया या विजयाबद्दल म्हणाली, “मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मुकूटाच्या लायक बनण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. याआधीच्या विजेत्यांकडून मला खूप प्रेरणा मिळाली.”
प्रांजल प्रिया या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर होती, तर छवी वर्ग तिसऱ्या स्थानी होती. यावेळी ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा मुकूट अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या हस्ते रियाला घातला.
“भारत यावर्षी नक्कीच ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट जिंकेल”, यावेळी तिने असा विश्वास व्यक्त केला. उर्वशी रौतेला या स्पर्धेतल्या परीक्षकांपैकी एक होती.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…