Friday, May 9, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Miss Universe India 2024 : ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा मुकूट गुजरातच्या रिया सिंघाच्या मस्तकावर विराजमान

Miss Universe India 2024 : ‘मिस युनिव्हर्स इंडिया’चा मुकूट गुजरातच्या रिया सिंघाच्या मस्तकावर विराजमान
'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'चा किताब गुजरातच्या रिया सिंघाने पटकावला आहे. इतर ५१ स्पर्धकांना रियाने मागे टाकत अत्यंत प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय.



'मिस युनिव्हर्स इंडिया 2024'च्या विजयानंतर आता ती 'इंटरनॅशनल मिस युनिव्हर्स 2024' या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. राजस्थानमधील जयपूर याठिकाणी रविवारी ग्रँड फिनाले पार पडला होता.



रिया या विजयाबद्दल म्हणाली, "मी इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या मुकूटाच्या लायक बनण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आहेत. याआधीच्या विजेत्यांकडून मला खूप प्रेरणा मिळाली."



प्रांजल प्रिया या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर होती, तर छवी वर्ग तिसऱ्या स्थानी होती. यावेळी 'मिस युनिव्हर्स इंडिया'चा मुकूट अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या हस्ते रियाला घातला.


"भारत यावर्षी नक्कीच 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट जिंकेल", यावेळी तिने असा विश्वास व्यक्त केला. उर्वशी रौतेला या स्पर्धेतल्या परीक्षकांपैकी एक होती.

 

 
Comments
Add Comment