डोंबिवली: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एक आरोपी प्लास्टिकच्या पिशवीत लघवी करायचा आणि हात न धुता त्याच हाताने फळे विकायचा. इतकंच तो ही पिशवी आपल्या फळांच्या गाडीवरच ठेवयचा आहे. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात केस दाखल करत त्याला अटक केली आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा २० वर्षीय फळ विक्रेत्याचे नाव अली खान असे आहे. व्हिडिओ निळजे भागातील आहे. आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २७१, २७२ आणि २९६ अंतर्गत केस दाखल करण्यात आलेली आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक चांगलेच वैतागले आहेत.
😡डोंबिवली पूर्व लोढा *छत्रपती शिवाजी महाराज चौक,निलजे..*
फ्रूट विक्रेत्याचे नाव अली.
पिशवी मधे लघवी केली .
त्यानंतर ग्राहक ला Froot विक्री करायला लागला .
😡😡😡😡 pic.twitter.com/GQMquK1LWF— अमित हिन्दू (@AmitGup06160836) September 22, 2024
याच पद्धतीचे एक प्रकरण उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे समोर आले होते. येथे एक दुकानदार लोकांना ज्यूसमध्ये लघवी मिसळून देत होता. या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ज्यूस विक्रेता आणि त्याच्य १५वर्षीय मुलाला अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या दुकानाबाहेरून एक लघवीने भरलेला कंटेनरही जप्त केला होता.
आरोपीची ओळख आमिर म्हणून झाली होती. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ज्यूस स्टॉलची पाहणी केली. येथे एका लघवीने भरलेला कॅनही ताब्यात घेतला. जेव्हा त्यांनी याबद्दल विचारले तेव्हा त्याने नीट उत्तर दिले नाही.